बुधवार, १५ मार्च, २०१७

बाबा.....

कॅप्शन जोडा

*साखर गोड आहे  कागदावर लिहून चालत नाही.*
*खाल्ल्यावरच तिची चव कळते.*

*तसेच,*

*नाते, मैत्री व प्रेम आहे सांगून भागत नाही,*
*तर ती प्रतिसाद देवून टिकवावी लागते.*

  ............................................बाबा माझं  तूमच्यावर खूप प्रेम आहे...................................




          तूच आई, तूच बाबा, तूच माझा श्वास आहेस.....
         गोंधळलेल्या सैराट मनाचा तूच रे विश्वास आहेस......
         तूच सागर , तूच घागर , तूच माझे माहेर आहेस.....
         भरकटलेल्या या जीवनाचा तूच रे आधार आहेस....
         तूच भास, तूच श्वास ,तूच माझा विश्वास आहेस......
        बेभान झालेल्या या मनाचा तूच रे आभास आहेस.....
        तूच वारा, तूच गारा, तूच मायेचा फूलोरा आहेस...
        आयुष्याला पूर्णत्व देणारा तूच प्रिय सितारा आहेस.....
          तूच संस्कार , तूच आचार, तूच सुंदर विचार आहेस....
         आयुष्याच्या रणांगनावरचा तूच प्रेमळ सुविचार आहेस......
          तूच ममता, तूच समता, तूच प्रगल्भ दिव्यता आहेस.....
          जीवनाच्या पहाटेची तूच रम्यता आहेस.......
          तूच सूपर, तूच स्पायडर , तूच माझा अभिमान आहेस...
           आयुष्याला  वैचारीक संजीवनी देणारा तूच माझा प्राण आहेस.....

                          कवियत्री-कोमल बाळासाहेब पोळ....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा